पहिल्यांदाच, किसान घेऊन येत आहे “संकेत” – भारताच्या ग्रामीण हृदयाची खरी नाडी ओळखणारी एक अभिनव संकल्पना! “संकेत” हे एक वेगळं आणि पुढचं पाऊल आहे, जे शेतकऱ्यांच्या गरजा, मतं आणि अनुभव जाणून घेण्यासाठी अभ्यासपूर्ण सर्वेक्षणांवर लक्ष केंद्रित करतं.
अशी काय खासियत आहे यात?
- डेटा-आधारित नवकल्पना - शेतकऱ्यांना खरंच काय हवं आहे हे समजून घेऊ – अंदाजावर नाही, तर वास्तवावर आधारलेलं ज्ञान.
- प्रत्यक्ष अनुभवाला महत्व - भारतभरातील लहान-मोठ्या शेतकऱ्यांचे अनुभव, मतं आणि गरजा – थेट त्यांच्या तोंडून.
- अभ्यासपूर्ण निर्णय - तुमचं कृषी उत्पादन, सेवा किंवा प्रचार मोहीम यांच नियोजन आता खऱ्या डेटावर आधारित करा. अंदाजे नाही तर 'संकेत'चा वापर करून वास्तविक निर्णय घ्या.
- संवादात्मक स्टॉल्स - लाईव्ह फीडबॅक डिस्प्ले आणि सर्व्हे किऑस्कच्या माध्यमातून इव्हेंटमध्ये प्रत्यक्ष संवाद साधा.
ह्याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो?
- शेतकरी - शेतकऱ्यांची मतं, त्यांच्या अडचणी आणि अनुभव यांना व्यासपीठ उपलब्ध होईल.
- प्रदर्शक - स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेऊन, त्यानुसार तुमची उत्पादने/सेवा यात योग्य ते बदल करता येतील.
- स्टार्टअप्स - नवीन उत्पादने किंवा सेवा सादर करण्यापूर्वी बाजारातील गरजा समजून घेता येतील.
किसान 2025 मध्ये लवकरच येत आहे!
“संकेत”ला भेट देणं विसरू नका – इथे तुमचं मत कृषी क्षेत्राचं भविष्य घडवू शकतं!