किसान इकोसिस्टममधील एक नवं पाऊल – “स्पेशल ऑफर्स”
१० ते १४ डिसेंबर २०२५, पुणे येथे होणाऱ्या किसान अॅग्री शोमध्ये. तुमच्या उत्पादनांची प्रसिद्धी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची ही एक उत्तम संधी आहे!
ह्याचे काय फायदे आहेत?
- ब्रँडची अधिक प्रसिद्धी - तुमची स्पेशल ऑफर थेट किसानच्या तिकिटावर दाखवली जाते – किसानला भेट देणाऱ्यांनी साईन अप केल्याक्षणापासूनच तुमची उत्पादने त्यांना दिसू लागतील.
- शेतकरी लीड्स - तुमच्या उत्पादनांमध्ये रुची दाखवणाऱ्या शेतकऱ्यांची संपर्क माहिती मिळवा – प्रदर्शनापूर्वी आणि नंतरही संवाद साधून त्यांना ग्राहकांमध्ये रूपांतरित करा.
- सहज आणि थेट कनेक्शन - स्टॉलला भेट देणाऱ्यांना सहजपणे एका क्लीकवर ह्या ऑफरमध्ये सामावून घेता येईल.
- तुमच्या स्टॉलवरच ऑफरचा लाभ - शेतकरी तुमच्या किऑस्कवर लगेच ऑफरचा उपयोग करू शकतात – ज्यामुळे त्यांची रूची थेट कृतीमध्ये बदलते!
या मोहिमेत सहभागी होण्याची प्रक्रिया काय आहे?
- तुमच्या खात्यावरून स्पेशल ऑफर सहज तयार करा.
- तुमची ऑफर टिकिट पेजवर आणि स्टॉलच्या जाहिरातीत दाखवली जाईल.
- ऑनलाइन सहभागी झालेली ऑफर, शेतकरी थेट तुमच्या स्टॉलवर वापरतील.