भारताची शेती बदलते आहे – आणि ‘किसान क्वेस्ट’ या बदलाला चालना देतोय सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि स्थानिक जाणिवांच्या माध्यमातून.
पुणे अॅग्री हॅकाथॉन २०२५ - यशस्वी समारोप!
१, २आणि ३ जून २०२५ रोजी पार पडलेल्या या विशेष उपक्रमाने कृषी क्षेत्रात नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रसार घडवणारा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या कार्यक्रमात तरुण नवविचारवंत, अनुभवी तज्ज्ञ आणि उद्योगातील नेते एकाच छताखाली एकत्र आले – भविष्यातील शेती नव्याने मांडण्यासाठी!
डिझाईन क्वेस्ट!
शेती आणि ग्रामीण जीवनातल्या खऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी केंद्रित डिझाईन स्पर्धा. या स्पर्धांद्वारे विद्यार्थी, नवोपक्रम करणारे आणि स्टार्टअप्सना प्रयोगशील, किफायतशीर आणि परिणामकारक उपाय तयार करण्यासाठी आमंत्रित केलं जातं. ही आहे तुमची संधी – उद्देशपूर्ण डिझाईन सादर करा, ओळख मिळवा, आणि भारताच्या खेड्यांसाठी चांगले उपाय तयार करण्यात सहभागी व्हा!
किसान संवाद!
संवाद म्हणजे मोकळा संवाद, एकत्र शिक्षण आणि खरे बदल घडवण्याची संधी. शेतकरी असो, विद्यार्थी असो किंवा नवोपक्रम करणारे – हे व्यासपीठ तुमच्यासाठी आहे – संवाद साधा, स्पर्धा करा आणि योगदान द्या. चला, एक संवाद एक पाऊल पुढे – आपण मिळून घडवूया शेतीचं भविष्य!
स्पर्धेत सहभागी का व्हावं?
- रु. ५०,००० पर्यंत रोख पारितोषिकं
- तुमच्या कल्पनेचं सादरीकरण प्रतिष्ठित किसान २०२५ मध्ये
- कृषी व ग्रामीण भारतातील मोठ्या प्रेक्षकांशी थेट जोडणं
- ओळख मिळवा आणि खऱ्या बदलात सहभागी व्हा
सहभागासाठी काय करावं लागेल?
www.kisan.quest या वेबसाइटला भेट द्या आणि सर्व सक्रिय स्पर्धा पाहा. संपूर्ण माहिती डाउनलोड करा गरज असेल तर टीम बनवा, आणि अंतिम तारखेपूर्वी तुमची कल्पना सबमिट करा!